तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची आढवा बैठक

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली येथेआज दिनांक 12 सप्टेंबर  सोमवार रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,व सर्व यांची आढवा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ. महमद घोडके, डॉ श्रीमती पांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश रुणवाल, डॉ नामदेव कोरडे, डॉ संदीप काळे,डॉ सावंत,वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र देवेंद्र जायभाये,कमलेश ईशी,आरोग्य सहाय्यक डी आर पारडकर, मौसम चौधरी,मुनाफ इतर कार्यक्रमास उपस्थित होते