*न्यूज रिपोर्टर: जिंतूर*

जिंतूर तालुक्यातील कसर येथे कृषी विज्ञान केंद्र परभणी यांच्यामार्फत प्रक्षेत्र दिन व शेतकरी मेळावा 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.तारामती गलांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी लोखंडे,जिंतूर तहसीलचे तहसीलदार मांडवगडे, 

व.ना. म. कृ.वि. परभणी चे व्यवस्थापक तथा कृषी विद्यावेता जी.डी गडदे, व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

       

     यावेळी श्रीमती आचल गोयल व प्रमुख मान्यवरांनी शेतकरी राजेश परसरामजी मगर यांनी त्यांच्या शेतात अवलंबलेल्या रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीन क्षेत्राला भेट देऊन या पद्धतीची माहिती घेतली.

तसेच श्रीकांत प्रसादराव मगर या शेतकऱ्याने शेतात लावलेल्या 8 वेगवेगळ्या जातीचे सोयाबीन पिकाची पाहणी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी राजेश मगर या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले व उपस्थित शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा सारख्या पद्धतीचे फायदे व्यक्त करून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी,शेतीपूरक व्यवसाय करावेत आणि शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले.

कृषी अधिकारी व्ही.डी लोखंडे यांनी शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना ची माहिती दिली तसेच जी.डी गडदे यांनी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांबद्दल माहिती दिली. तर डॉक्टर प्रशांत भोसले यांनी नियोजनबद्ध शेती कशी करावी व शेतकऱ्यांनी उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाचे मार्गदर्शन घ्यावे असे मनोगत व्यक्त केले

शेवटी प्रकल्प व्यवस्थापक शरद ठमके यांनी उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाची योग्य ती माहिती देऊन प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना कसा घेता येईल याचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी गुलाबी बोंड आळी व कीटकनाशकाच्या सुरक्षितेबाबत जनजागृती कृषी रथाचे उद्घाटन श्रीमती आचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित तुपे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. प्रशांत भोसले यांनी मांडले तसेच आभार सवईसिंग निठरवाल यांनी मांडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक शरद ठमके तसेच क्षेत्र सहाय्यक विष्णू सांगळे, प्रदीप अंभूरे, महेश देशमुख, पंढरीनाथ इक्कर, प्रदीप शिंदे, अनंता रसाळ, उर्मिला घाटगे, वर्षा मगर तसेच गावकऱ्यांनी परिश्रम घेतले

या मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते