बीड (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील महिलेला बीड जिल्हा शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले होते. सदरील महिलेचे सिझर करण्यात आले. मात्र या महिलेची तब्येत बिघडल्याने तिला खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. सदरील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिला दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी आरोप केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी चौकशीचे आदेश दिले. पाटोदा तालुक्यातील सिमा अजय मांजरे (वय २५) या महिलेला प्रसुतीसाठी ४ सप्टेंबरला जिल्हा शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सदरील महिलेचे सिझर करण्यात आले. तीन दिवसानंतर या महिलेला जिल्हा शासकीय रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र अचानक १० सप्टेंबरला या महिलेची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात महिलेला भरती करण्यात आले. सदरील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी चौकशीचे आदेश दिले.