जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ५३० व्यक्तींच्या स्टॅबची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १५ बाधितांची भर पडली असून, प्रकृती ठणठणीत झाल्याने ४ जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६ हजार ८५६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यापैकी १ लाख ४ हजार ३१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ६० रुग्ण उपचाराधीन असून, यातील १ रुग्णरुग्णालयात उपचाराधीन असून, उर्वरित रुग्ण होमआयसोलेशनमध्ये असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.