वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संचालक डॉ. शिवाजी तिडके यांनी केला. तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शहरातील डॉ. तिडके क्लासेसच्या यशाची परंपरा मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षीही कायम राहिली. डॉ. शिवाजीराव तिडके संचालित डॉ. तिडके क्लासेसचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी यशाचे शिखर गाठत आहेत. या वर्षीच्या नीट परीक्षेत यश मिळवित एमबीबीएससाठी पात्र ठरले आहेत. विठ्ठल अवघड (५९३) संतोष यादव (५७७), सचिन राठोड (५६९), ज्ञानेश्वर निर्मळ (५५८), अजय टेकमोगे (५३९), संतोष डांबे (५३१), विश्वास तिडके (५२८), सुदाम बांगर (५१२) हे विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे तिडके क्लासेस येथे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील गरीब, होतकरू विद्यार्थी, ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शिक्षणात मदत करणारे म्हणून डॉ. तिडके यांची ओळख असून याही वर्षी नीट परीक्षेत यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.