बीड येथील शक्ती प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे ११ सप्टेंबर रोजी वितरण झाले. स्काउट भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमात गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे होते. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, डॉ. विक्रम सारुक, माजी मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी, मंगल कैंडे, अक्षय केंडे यांची उपस्थिती होती. शिक्षक चंद्रकांत जोशी, आशा कोळपकर, गोविंद कदम, प्रभावती जाधवर, एल.बी. जाधव, प्रा. नामदेव साळुंके, आर. व्ही. गोसावी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. अखिलेश ढाकणे यांचा उपक्रमशील संस्था चालक व सिद्धार्थ सोनवणे यांचा विशेष पुरस्काराने गौरव झाला. विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण झाले. सेवापूर्तीबद्दल केंद्रप्रमुख गोविंद रामदासी यांचा सत्कार झाला. प्रास्ताविक संजय चौसाळकर यांनी केले. एल. बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले. आभार सुहास पालीमकर यांनी मानले. सूर्यकांत जोगदंड, लक्ष्मीकांत खडकीकर कल्याण जावळे, गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल यांनी परिश्रम घेतले.