परभणी(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ संलग्नित परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या स्थायी समितीची बैठक आज रविवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले विद्यालय परभणी येथे संपन्न झाली. त्यात शैक्षणिक वर्ष 2022 ते 2027 ची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी बालासाहेब भांगे तर सचिवपदी देवानंद अंभोरे यांची निवड करण्यात आली.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्या तालुका मुख्याध्यापक संघाच्या निवडीनंतर परभणी जिल्हा स्थायी समितीची बैठक घेऊन परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची निवड करण्याचे ठरले होते. या स्थायी समितीने पदाधिकाऱ्याची बिनविरोध निवड केली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातील नांदेड जिल्हाध्यक्ष संजय हिप्परकर, निर्वाचन निरीक्षक म्हणून परभणी येथे आले होते. त्यांच्यासोबत मोती भाऊ केंद्रे, पाटील यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

 परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बालासाहेब भांगे, उपाध्यक्षपदी दिगंबर मोरे व राजकुमार धबडे, सचिव पदी देवानंद अंभोरे, सहसचिवपदी उपेंद्र दुधगावकर, कोषाध्यक्षपदी रंगनाथ चव्हाण, सह कोषाध्यक्षपदी विष्णू मुंडे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून गोविंद चोरघडे, सदस्यपदी वंदना कुंभेकर ,शेख समीर, उद्धव भुसारे, श्यामसुंदर शेळके ,राजेंद्र कांबळे ,निशांत हाके व जया जाधव यांची निवड करण्यात आली. विभागीय प्रतिनिधी म्हणून देविदास उमाटे ,गणेश शिंदे व शिवाजी पाचकोर यांची निवड निर्वाचन अधिकारी संजय हिप्परकर यांनी घोषित केली. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.