मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद, ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 

सोमवार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने चिकलठाणा, औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने पैठणकडे प्रयाण. दुपारी 1.40 वा. संत एकनाथ महाराज मंदिरास भेट व नाथ महाराजांचे दर्शन. (स्थळ: पैठण, जि.औरंगाबाद) दुपारी 1.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण. दुपारी 2 वा. पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ: कावसानकर स्टेडियम, पैठण) दुपारी 3.30 वा. पैठण येथून मोटारीने आपेगाव ता. पैठणकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन (स्थळ: आपेगाव, ता.पैठण). सायं 4.15 वा. आपेगाव, ता.पैठण येथून मोटारीने पाचोड ता. पैठणकडे प्रयाण. सायं 4.45 वा. श्री. संदिपान भुमरे, मंत्री, रोहयो व फलोत्पादन यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव (स्थळ : पाचोड ता.पैठण)सायं 5.15 वा. पाचोड ता.पैठण येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळ औरंगाबादकडे प्रयाण. सायं 6 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.