हर्सूल तलाव पूर्णक्षमतेने भरला;ओव्हरफ्लो मुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
औरंगाबाद;
शहरातील हर्सूल तलाव शंभर टक्के भरले असून अतिरिक्त पाणी ओवर फ्लो होत आहे. यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने खाम नदी काठावरील राहणारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उप अभियंता पाणीपुरवठा के एम फलक, सहायक आयुक्त वार्ड क्रमांक एक संजय सुरडकर ,जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आणि स्वच्छता निरीक्षक गौतम कांबळे यांनी पाहणी करून खाम नदीच्या काठावरील राहणारे लोकांना सतर्कतेच्या इशारा दिला.