पालम / परभणी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवाची धामधूम नव्हती. पण यंदा कोरोना चे संकट दूर झाल्याने गणेशभक्तांनी उत्साहात गणेश उत्सव साजरा करत आहेत. आज दि. ९ सप्टेंबरला लाडक्या गणरायाला निरोप दिला. त्यासाठी गणेश मंडळांकडून गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण होत असते, पण यंदा गुलाला ऐवजी भक्तांनी फुलांची उधळण करत श्री चे विसर्जन केले.
यासाठी स्वतः पोलिसांनीच पुढाकार घेत पालम पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांना झेंडूची तब्बल ५ क्विंटल फुले दिली.
शहरातील सर्व गणपतींचे विसर्जन करण्यासाठी पालम नगरपंचायत च्या वतीने नियोजित विहिरीमध्ये श्री चे विसर्जन केले गेले.गणपती विसर्जनापूर्वी पोलिस प्रशासनाकडून व महसूल प्रशासनाकडून नियोजीत विहिरीच्या परीसराची पाहणी केली गेली यावेळी तहसीलदार प्रतिभाताई गोरे, मुख्याधिकारी संतोष लोमटे, नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर , ओ.एस. बालासाहेब कानडे, यांची उपस्थिती होती
या दरम्यान शहरातील विवीध गणेशमंडळांनी डिजे साउंड न वाजवता पांरपारीक वाद्यांच्या गजरात शहराच्या मुख्य मार्गावरुन श्री ची मिरवणूक काढत शांततेत विसर्जन करण्यात आले यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मारोती कारावार, पो.उपनि. सुप्रिया केंद्रे , स.पोनि.संदिप भोसले, पि.एस.आय सुभाष आगळे, स्था.गु.शाखे चे बेद्रे, व पोलिस कर्मचारी यांच्या कडून चोख बंदोबस्त ठेवला होता. या दरम्यान विसर्जन स्थळी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले