औंढातालुका 'पी.एम.किसान'चे डाटा अपलोडचे काम पूर्ण महसुल विभागाचा ४६ हजार ३५१ लाभार्थ्यांना दिलासा

औंढा नागनाथः- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पी. एम. किसान योजनेतील ४६ हजार ३५१ पात्र लाभार्थ्यांची

तांत्रिक माहिती भरण्याचे (डाटा अपलोड) करण्याचे काम महसूल विभागाने पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे,ज्या विभागाची ही योजना आहे, त्या कृषी विभागासह ग्रामविकास विभागाच्या अकडत्या भूमिकेमुळे हा सर्व

पडलेला भार महसूल विभागाने पेलत हे काम पूर्ण केले. यामुळे औंढा तालुक्यातील पात्र सर्व बळीराजांना मोठा

दिलासा मिळाला आहे.केंद्र शासनाकडून पात्र लाभार्थ्यांनी दर चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे एका वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आवश्यक डाटा(तांत्रिक माहिती) आणि संबंधित लाभार्थ्यांने केवायसी पूर्ण न केल्याने हे अनुदान मिळण्यास अडचण येत आहे.हा डाटा अपलोड करण्यात औंढा तालुका काहीशी अडचण येत होती .माञ महसुल विभागाने हे सर्व काम राञ दिवस करत 'पी.एम.किसान'चे डाटा अपलोडचे काम पूर्ण केले.गेल्या तीन दिवसांपासून अहोरात्र ऑनलाईन पद्धतीने डाटा अपलोड करण्याचे काम सुरू होते.औंढा तालुक्याचे 'पी.एम.किसान'चे डाटा अपलोडचे काम १००% पुर्ण झाले.अशी माहीती तहसिलदार डाँ कृष्णा कानगुले यांनी दिली आहे.

   पी एम किसानचा डाटा अपलोड करण्यासाठी तहसिलदार डाँ कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायबतहसीलदार लता लाखाडे,महसूल सहाय्यक इर्शाद पठाण, संतोष पोले ,राघव जोशी, मंडळ अधिकारी ,तलाठी यांनी अथक परिश्रम घेतले. पी एम किसान चा 122 गावाचा डाटा अपलोड करणे पूर्ण झाले आहे. ४६ हजार ३५१ लाभार्थ्यांना पी एम किसानचा फायदा होणार आहे.,,,,