शिरूर : विशेष प्रतिनिधी

                गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात शिरुर शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूकीची सुरुवात मानाचा पहिला गणपती असणाऱ्या रामआळीतील श्रीराम मंदिरातील गणेशा पासून झाली. दुपारी एकच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते राम मंदिरातील गणेशाची आरती झाल्यावर 

मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.

                    सायंकाळी साडेसहा वाजता मानाचा पहिला श्रीराम मंदिरातील गणेशाचे विसर्जन झाले. शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मंडळ, छत्रपती संभाजी महाराज गणेश मित्र मंडळ संभाजीनगर (हुडको कॉलनी), डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी दुपारी तर सूरजनगर गणेश मित्र मंडळ, खारा मळा गणेश मित्र मंडळ येथील गणेशाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. सकाळ पासून शहरातील लाटे आळीतील विसर्जन घाटावर भाविकांची गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती. शिरुर नगरपरिषदने याठिकाणी निर्माल्य कलश निर्माल्याचे संकलन करण्यासाठी ठेवला होता. त्याच बरोबर नदीकिनारी बॅरीकेडस ही लावण्यात आले होते. त्याखेरीज मुर्ती संकलन केंद्र ही नदी किनारी होते. या ठिकाणीही मोठ्या प्रतिसाद भाविकांनी दिला.

               वात्सल्यसिंधु संस्था व शिरुर नगरपरिषद यांनी मुर्तीचे संकलन केले. यावेळी शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर, स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे, वात्सल्य सिंधु संस्थेच्या सुनंदा लंघे, उषा वाखारे, शैलेश वाखारे, किरण बनकर, प्रा . सतीश धुमाळ आदी उपस्थित होते. 

                 सायंकाळी विद्युत रोषणाई केलेले गणेश मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ लाटेआळी यांच्या गणेशाची मुर्ती गजरथात आरुढ होती. रथावरील विठ्ठलांची भव्य मुर्ती ही लक्षवेधी होती. आखील रामआळी गणेश मित्र मंडळ यांनी विसर्जन मिरवणूक साठी मयूर रथ तयार केला होता. नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या हलवाई चौक गणेश मित्र मंड्ळाचा हलवाई चौकाचा राजा आकर्षक अश्या शिवशंकर रथात आरुढ होता. हलवाई गणेशासाठी बनविलेल्या तीन किलो चांदीचा वजनाचा मुकुट प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते हलवाई गणेशाला अर्पण करण्यात आला. हनुमान गणेश मित्र मंडळ मारुती आळी यांच्या विसर्जन रथावर राधा कृष्णचा देखावा सादर करण्यात आला होता. अंजिक्यतारा गणेश मित्र मंडळ यांच्या गणेशाची मुर्ती घोड्याच्या बग्गीत विराजमान होती. विठ्ठल मंदिर गणेश मंडळ कुंभार आळी यांची गणेश मुर्ती विद्युत रोषणाई केलेल्या रथात विराजमान होती. आझाद गणेश मित्र मंडळ लाटेआळी यांची गणेश मुर्ती आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पुष्परथात विराजमान झाली होती.

                    पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ सोनार आळी यांची गणेशाची मुर्ती घोड्याच्या बग्गीत होती. आडत बाजार गणेश मित्र मंडळ यांची गणेशाची मुर्ती भव्य अश्या मयूररथात होती. श्री गोपाल मोठी तालीम गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी सादर केलेल्या देखावातील भगवान शंकराची मुर्ती लक्षवेधून घेणारी होती. युवा गोपाल तालीम गणेश मित्र मंडळ यांनी साईदरबारचा देखावा सादर केला. भव्य साईबाबांची मुर्ती देखावाचे आकर्षण ठरली. सिध्दार्थ प्रतिष्ठान शांतीनगर यांच्या भव्य गणेशमुर्ती भोवती ही आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता. रामलिंग गणेश मित्र मंडळ करंजुले नगर यांनी आकर्षक अश्या पुष्पसजावटीतून त्रिशुल रथाचा देखावा सादर केला होता. जय बजरंग गणेश मित्र मंडळ जोशीवाडी यांनी बैलगाडी रथात गणेशाची मुर्ती विराजमान केली होती. त्रिमुर्ती गणेश मित्र मंडळ रेव्हन्यू कॉलनी यांनी विसर्जन मिरवणूकीसाठी फुलाच्या सजावटीचा देखावा सादर केला होता .

अमृतमहोत्सव वर्ष साजरा करत असणाऱ्या आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक यांनी आकर्षक अश्या लक्षवेधी रथ विसर्जनासाठी केला होता. श्री साई गणेश मित्र मंडळ एकतानगर यांनी आकर्षक रथ विसर्जन साठी केला होता. आखिल गुजर मळा गणेश मित्र मंडळ यांनी ही आकर्षक देखावा सादर केला होता. सिंहगर्जना गणेश मंडळ ढोरआळी यांनी ही आकर्षक अशी सजावट विसर्जन मिरवणुकीसाठी केली होती. भाजी बाजारातील मुंजोबा गणेश मित्र मंड्ळाने शारदा गजाननच्या मुर्ती भोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे गणेश मित्र मंडळ लाटेआळी या मंडळाची गणेशाची मुर्ती बैलगाडीत विराजमान होती. मुंजोबा गणेश मित्र मंडळ मुंजोबा मंदिर यांनी साई दरबारचा देखावा सादर केला होता. प्रीतम प्रकाश नगर गणेश मित्र मंड्ळ यांनी आकर्षक अशी सजावट केली होती .सर्वात शेवटी आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक यांच्या गणेशाचा विसर्जनाने विसर्जन मिरवणूकीची सांगता झाली.

           दरम्यान विसर्जन घाटावर संरक्षणाच्या दृष्टीने नदी किनारी बॅरीगेड लावण्यात आली होती. त्याच बरोबर या परिसराची साफसफाई करुन हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली. विसर्जन घाटावर जीवरक्षक तैनात होते. विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळाच्या स्वागतासाठी नगरपरिषदचा वतीने हलवाई चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर, :पालिकेचे आधिकारी अय्युब सय्यद यांनी या ठिकाणी गणेश मंडळाचे स्वागत केले. विसर्जन मिरवणूकी करिता १०० हून आधीक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते असे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. दरम्यान लाटेआळीतील विसर्जन घाटावर विसर्जना साठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप मनसेचा वतीने करण्यात आल्याचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सांगितले.

             दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही विसर्जन मिरवणूक दरम्यान भेट देवून विसर्जन घाटावरील मुर्तीदान कक्षास भेट दिली त्याच बरोबर काही गणेश मंडळाच्या आरत्या ही केल्या