समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्ती आपली प्रगती करावी ही अपेक्षा ठेवून कार्य करत असते मात्र फार कमी लोक आपण जे कार्य केले ते कार्य समाज हिताचे असावे असा अट्टाहास ठेवतात त्यात निवृत्ती सांगवे  सोनकांबळे यांचा अग्रक्रम लागतो आपण या समाजातून मोठे झालो म्हणजेच आपण या समाजाचे काही देणे लागतो याची जाण आणि भान कायम ठेवून कार्य करत राहणारे निवृत्ती सांगवे हे एक निर्मोही व्यक्तिमत्व आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही कारण ते दोन वेळा नगरसेवक होते मात्र या काळात कंत्राट दारी गुत्तेदारी किंवा कोणाचे काम करतो म्हणून पैसे घेणे अशा पद्धतीचा कोणताही आरोप त्यांच्यावर कधीच कोणी करू शकले नाही किंवा केले नाही आपल्या प्रभागात तर ते लोकप्रिय आहेतच आहेत शिवाय संपूर्ण उदगीर मध्ये एक धडाडीचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे याचाच परिणाम म्हणून उदगीर शहरातील सिद्धार्थ सोसायटी दत्तनगर मुसा नगर संजय नगर गोविंद नगर चंद्रमादेवी नगर किल्ला गल्ली बोधन ची आई भाग म्हाडा कॉलनी इत्यादी प्रभागातून कार्यकर्त्यांनी निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करायचा निर्धार केला आहे विशेष म्हणजे हा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला जावा असाही अट्टाहास कार्यकर्त्याचा राहणार आहे अशी माहिती राष्ट्रीय दलित अधिकार म्हणजेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुष्मिता ताई माने रवी जावळे बंटी घोरपडे अखिल भाई शेख मुखराम जागीरदार साबेर पटेल इत्यादी नेत्यांनी दिला आहे निवृत्ती सांगवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दर्ग्यात चादर अर्पण करणे वृक्षारोपण करणे गोरगरिबांना निष्ठाण भोजन देणे रुग्णांना फळे वाटप करणे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे वयोवृद्ध व्यक्तीसाठी मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिरांच्या आयोजन करणे अशा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस समाजकार्यातूनच करावा या उद्देशाने बेघर असलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करणे असे उपक्रम राबवणार आहेत असे ही माहिती या प्रसंगी संयोजक समितीच्या वतीने देण्यात आली आहे निवृत्ती सांगवे यांनी सामाजिक कार्याची जाण आणि भान ठेवून वेळप्रसंगी स्वतः च्या शिक्षणाला बाजूला ठेवून सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला होता त्या काळात नामांतरीची चळवळ नुकतीच सुरू झाली होती त्या चळवळीत पूर्ण झोकून देऊन त्यांनी काम केले इतकेच नाही तर त्या काळात ग्रामीण भागात गोरगरीब दलित मुस्लिम अल्पसंख्या उपेक्षित शोषित घटकांना प्रस्थापिता कडून त्रास दिला जायचा त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवून संपूर्ण तालुक्यात गोरगरिबाचा कैवारी बनण्याचे पुण्य या नेत्याने घेतल्यामुळे दलित मुस्लिमांच्या गळ्यातील ताईत बनला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणे हा स्वतः त्यांचा स्वभाव आहे.