सध्या इ - सेवेमुळे अनेक गोष्टी सुकर व सुलभ झालेल्या असतांना सुद्धा अमरावती विभागातील पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया हि अद्यापही ऑफलाईन असल्यामुळे पदवीधर मतदानावर परिणाम होऊन मतदान कमी होण्याची शक्यता आहे त्यासाठी पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया हि तात्काळ ऑनलाईन व्हावी यासाठी इसा महाराष्ट्र राज्य संघटनेचे विभागीय, सचिव श्याम प्रजापती तसेच ॲड डॉ. प्रवीण बारंगे विभागीय अध्यक्ष (इसा महाराष्ट्र राज्य) यांनी अमरावती विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.पदवीधर मतदार ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसोबतच, ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाल्यावर हार्ड कॉपी कुठल्याही कार्यालयात जमा करण्याची सक्ती नसावी, नोंदणी करण्यासाठी लागणारे दस्तऐवज उदाहरणार्थ डिग्री /अंतिम वर्षाची मार्कशीट, आधार कार्ड, व फोटो कोणत्याही फॉरमॅट मध्ये जोडता यावा, कार्यक्षेत्राचे बंधन नसावे, सत्य प्रतीची अट काढून स्वसाक्षांकीत प्रति स्वीकारण्यात याव्या. त्यामुळे पदवीधर मतदाराची संख्या वाढून मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार अन्यथा ज्या पवित्र उद्देशाने पदवीधर मतदारसंघाची योजना निर्माण झाली त्या उद्दिष्टाला हरताळ फासला असल्याचे मत इसा संघटनेचे विभागीय सचिव श्याम प्रजापती यांनी व्यक्त केले.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं