परभणी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज शनिवारी (दि.10) नाभिक समाजातील 10 वी आणि 12 तील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उदघाटन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणराव दळे, दामोदर बिडवे, किरण बिडवे, पांडुरंग भवर, रेणुकादास वैद, सुरेंद्र कावरे, युवराज शिंदे, शिक्षण आधिकरी विठ्ठल भुसारे, किर्तीकुमार बुरांडे, प्रकाश बनमेरू आदींची प्रमुख उपस्थिती होती. या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नाभिक समाजाचे संपत सवणे, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास नाभिक समाजातील महिला, पुरुष व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.