Home

इंडो एनर्जी कोलसा कंपनीची दादागिरी आता खपवून घेणार नाही...

Raghunath Ganpat kadu

September 09, 2022

 इंडो एनर्जी कोलसा कंपनीची दादागिरी आता खपवून घेणार नाही...

तर त्यांच्या आरमुठेपणाच्या विरोधात केली लेखी तक्रार

रोहा तालुक्यातील इंडो एनर्जी कोळसा जेट्टी,सानेगाव. या जेटीच्या विरोधात स्थानिकांनी व शासकीय आश्रम शाळा तसेच सानेगाव हायस्कूलच्या कर्मचारी शिक्षकवृंद यानी या कंपनीच्या व्यवस्थापकांना इशारा दिला होता.तो म्हणजे या रस्त्याने येजा करणाऱ्या चावरे तरीतील प्रवासी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी अनेकदा चालत,अथवा वहानाने जातायेता घसरुन मानसे जनावरे पडली आहेत.

इतका घान डस्टिंग चिखलमय रस्ता झाला आहे या बाबत रायगड स्वाभिमान न्यूज ने काही दिवसांपूर्वी बातमी द्वारे आवाज उठवला होता.तितक्यापूर्ते डोळेझाक करुन आता पून्हा ही कंपनी रोडवर जेटीचा गाळ टाकून दादागिरी करीत असल्याचे दिसते

या बाबत येथील प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरुन मार्ग काढावा लागत आहे.अखेर शासकीय आश्रम शाळा व सानेगाव हायस्कूलच्या माध्यमातून या प्रकाराला खिळ बसावी म्हणून समंधीत कार्यालयात तक्रार केली आहे.

जर का तक्रारीचे निवारण झाले नाही तर रस्त्यावर येऊन कंपनी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य व सानेगाव हायस्कूलचे शिक्षणसमितीचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी दिला आहे.त्यांच्या सोबत या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांनी पाठींबा दिल्याचे समजते.तरी इंडो एनर्जी कोलसा कंपनींने अधीक मनस्ताप न देता व अंदोलन छेडण्या आधी हे घाणीचे साम्राज्य थांबवावे याची समंधीत कार्यालयाने सुद्धा दखल घ्यावी.अन्यथा पुढील घटणेचे सर्वस्वी जबाबदार कंपनी व प्रशासन राहील अशी समज देखील या वेळी देण्यात आली.असे शिक्षणकमीटीचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांच्या कडून सांगण्यात आले.