उदगीर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत आर्यवाश्य ऑफिशियल प्रोफेशनल असोसिएशन या सामाजिक संघटन संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण केले ही संस्था अनेक समाजा उपयोगी उपक्रमात सातत्याने सक्रिय योगदान देत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या संस्थेमार्फत वस्तीगृहातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वितरित केले याप्रसंगी अहोफा सहसचिव महेश गादेवार अहोपाचे सभासद तथा लालबहादूर शास्त्री संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वटमवार मुख्याध्यापक प्रदीप राव कुलकर्णी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड पर्यवेक्षक माधव मटवाले योजना प्रमुख अनिता येलमट्टी उपस्थित होते