मुख्यमंत्रीच्या बंदोबस्ताची उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी केली पाहणी.

पैठण(विजय चिडे) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह विविध मंत्री पैठण नगरीत येऊन दि १२ रोजी संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेणार आहे.या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील वाहतूक मार्गाची पाहणी पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल पाटील,ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक खांडेकर,पोउपनि तायडे, पोना सचिन भुमे, अमोल सोनवणे, न. प मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी शनिवारी पाहणी केली आहे.