माजलगाव :- नवसाला पावणारा व १२२ वर्षांची परंपरा असलेल्या टेंबे गणपतीचे आज दि १० विसर्जन होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी दिली आहे.
या गणेश मंडळाच्या वतीने पाच दिवस विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबर सामाजिक बांधीलकी जोपासत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते तर लहान मुलांसाठी दंत तपासणी शिबीराचे देखिल आयोजन करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सवावर चलचित्र देखावा सादर केला आहे. तसेच पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन देखिल केले होते. मंडळाच्या वतीने केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत गणेशभक्तांनी उत्स्फुर्तपणे श्रीचरणी वही व पेण अर्पण केले. आज रविवारी ता.११ श्रींचे विसर्जन होणार असुन या मिरवणुकीमध्ये मानाचे टेंबे राहणार आहेत तसेच श्रीविसर्जन मिरवणुकीमध्ये सजिव देखावा सादर केला जाणार आहे तसेच सायंकाळी सहा वाजता टेंब्यांनी टेंबे गणपतीची आरती होउन विसर्जन मिरवणुक निघणार आहे.
- चौकट -
टेंबे गणेश मंदिराच्या बांधकाम पुर्णत्वाकडे असुन या मंदिराच्या उभारणीसाठी भाविकांनी सढळ हाताने मंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहेनवसाला पावणाऱ्या , ऐतिहासिक टेंबे गणपतीचे आज विसर्जन.