कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

             भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत मिरवडी, ता. दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले.

          यामध्ये आंबा, चिंच, पेरू, जांभूळ अशी प्रत्येकी एक फळझाड म्हणून वृक्षदान करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना झाड लावून फोटो वर्गशिक्षकाकडे पाठवून पुढच्या वर्षी सर्वेक्षण करून प्रथम तीन मुलांना विशेष देखभाल साठी प्रोत्साहित म्हणून 1000 रु बक्षीस देण्यात येणार असून मुलांकडून वृक्ष प्रतिज्ञा घेण्यात आली.

          या वेळी सरपंच सागर शेलार, चेअरमन बाळासाहेब शिंदे, प्रवीण कांबळे, किशोर थोरात सतीश मल्लाव, निलेश फणसे, अजीस शेख, भाऊ थोरात, दीपक काळे, मुख्याध्यापक चव्हाण सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.