परभणी(प्रतिनिधी)
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.9) शहरात 27 ठिकाणावरुन मुर्ती संकलित करुन शुद्धीकरण केंद्र येथे कृत्रिम तलावात शहरातील एकूण 29 हजार 448 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
श्रींच्या विसर्जनासाठी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ठिकाणी मुर्ती संकलन करण्यात आले. प्रभाग समिती अ अंतर्गत शारदा महाविद्यालय, सहकार नगर पाटी पेडगाव रोड, गणपती चौक जिंतूर रोड, विसावा कॉर्नर जिंतूर रोड, बाल विद्यामंदिर नानलपेठ, साने चौक, मारुती मंदिर, तेलंग गल्ल, मारुती मंदिर मल्हार नगर येथे संकलन केंद्र होते. तसेच शहरात सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनाच्या 24 वाहनाची व्यवस्था केली होती.मिरवणुक मार्गावर आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पाहणी केली.तसेच खड्डे दिसताच ते तात्काळ बुजवण्यात आले.
शिवाजी चौकात स्वागत कक्ष
शिवाजी चौक येथे महानगरपालिकेने गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारला होता.यावेळी नायब तहसीलदार चव्हाण, कर अधिक्षक अल्केश देशमुख, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, राजाभाऊ मोरे,किशन देशमुख,भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी,समिंद्रे,मनोज खानापुरकर,उमेश जाधव,काकडे यांनी मनपाच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत केले.
विसर्जनासाठी जलशुध्दीकरण केंद्र येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला. याठिकाणी चोख बंदोबस्त व व्यवस्था करण्यात आली होती.याठिकाणी आयुक्त तृप्ती सांडभोर, आतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,शहर अभियंता वसीम पठाण,यांत्रीक विभाग प्रमुख तन्वीर मिर्झा बेग,मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद,करण गायकवाड,विकास रत्नपारखे उपस्थित होते.
24 वाहने सजवून केले मुर्ती संकलन
महापालिकेने मुर्ती संकलित करण्यासाठी मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद, करण गायकवाड, विकास रत्नपारखे यांनी 24 वाहने सजवून परिश्रम घेतले. सहायक आयुक्त आवेज हाश्मी, शिवाजी सरनाईक, जुबेर हाश्मी यांनी आपल्या प्रभागातील सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. रात्री 1 वाजेपर्यंत सर्व गणपतीचे विसर्जन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार चव्हाण उपस्थित होते.सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे,श्रीकांत कुरा,तन्वीर मिर्झा बेग,शेख इस्माईल,प्रल्हाद देशमाने,सुनील झांबरे,विद्युत विभागाचे मो.सोहेल,पाणीपुरवठा विभागाचे मो.इस्माईल,अग्निशामन विभागप्रमुख दिपक कानोडे,पवन देशमुख,उद्यान विभागाचे मो.अथर आदींनी परिश्रम घेतले.