बीड (प्रतिनिधी) - गणपती विसर्जनासाठी ज्या रस्त्यावरून जाणार होते त्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर विसर्जन रस्त्यावरील खड्डे अर्धे-धूर्दे थातुरमातुरपणे बुजविण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे अर्धवट पालन केल्याचे दिसून आले. यामुळे शहरातील खड्ड्यांना गणपती अर्धेच पावले असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकातून म्हटले आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

      याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील राजुरी वेस ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस चौक या रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून अगणित खड्डे पडलेले आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु याकडे बीड नगरपरिषदेचे दुर्लक्ष आहे. गणपती विसर्जना निमित्ताने का होईना जिल्हाधिकारी साहेबांनी या विसर्जन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले जावे असे आदेश दिल्याने विसर्जनापूर्वी थातूरमातूरपणे येथील खड्डे अर्धे बुजविण्यात आले तर अर्धे तसेच सोडून देण्यात आले. सोडून देण्यात आलेले खड्डे आता पुन्हा तसेच पडून राहणार हे निश्चित. शिवाय जे खड्डे बुजवलेत त्यात टाकलेल्या मटेरियल मध्ये डांबराचा पत्ता नाही. नुसतीच खडी आणि खच चा फुफुटा स्पष्ट दिसून येतो आहे. तेव्हा बुजविलेले खड्डे हे किती दिवस टिकून राहतील हा प्रश्नच आहे. तूर्तास तरी या दोन्ही रस्त्यावरील खड्ड्यांना विसर्जनाच्या निमित्ताने का होईना गणपती अर्धे पावले आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अर्धवट अंमलबजावणी करण्यात आली असे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.