प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासुन तयार होणा-या मुर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत तसेच मुर्ती सुशोभित करण्याकरीता वापरण्यात येणारे रसायनिक रंगामूळे पर्यावरणाची हानी होते. त्या अनुषंगाने याबाबत विविध स्वरुपाच्या उपाययोजना करुन गणेशोत्सवा दरम्यान मातीच्या मुर्तीचा वापर जास्त प्रमाणात व्हावा याकरीता अमरावती महानगरपालिकेकडून जनजागृती करण्याकरीता तसेच नागरीकांना मातीपासुन निर्मित मुर्ती उपलब्ध करुन देण्याचे अनुषंगाने वेळोवेळी मुर्तीकार संघटनेच्या बैठक आयोजित करुन मुर्तीकारांनी मातीच्या मुर्ती जास्त प्रमाणात तयार कराव्यात याकरीता प्रेरित करण्यात आले.
त्याचे फलस्वरुप म्हणून शहरातील काही मुर्तीकारांकडून अमातीची मुर्ती निर्मीती सुरु करण्यात आली. सन २०१७ मध्ये सुमारे ६०००, सन २०१८ मध्ये सुमारे ८००० आणि सन २०१९ मध्ये सुमारे १८०००, सन २०२० सुमारे ५३०००, सन २०२१ मध्ये सुमारे ६१००० सुमारे या वर्षामध्ये सुमारे ७०००० मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्यात आले असल्याची माहिती मुर्तीकार संघटनेकडून प्राप्त आहे. मातीच्या मुर्ती विक्रीकरीता काही जागा राखीव ठेवण्यात यावी अशी विनंती मुर्तीकार संघटनेकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने यावर्षीचे गणेश उत्सवाकरीता शहरातील नेहरु मैदान येथील शाळा इमारत लगतच्या दोन ओळी मधील दुकान क्रमांक १ ते २२ यांचेकडे पर्यावरण पुरक गणेश मुर्ती विक्रीकरीता उपलब्ध असुन त्यांचे विक्रीस सहाय्याकरीता महानगरपालिकेकडून प्रायोजित करण्यात आले आहेत.पर्यावरण पुरक (Eco Friendly) गणेशोत्सव साजरा करण्याकरीता माती (शाडू) पासून निर्मीती केलेल्या पर्यावरण पुरक मूर्तीचा वापर करावा. गणेश मूर्ती विक्रेत्याकडे गणेश भक्तांनी मातीपासून निर्माण झालेल्या मुर्तीची मागणी करावी असे आवाहन अमरावती महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.