बीड (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे - सोलापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकालगत ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयताचे वय अंदाजे ४० आहे. त्याच्या अंगात टीशर्ट व जीन्स पँट आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी अधिकारी - अंमलदार बाहेरच होते.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक देविदास आवारे, हवालदार पी. टी. चव्हाण, आनंद मस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.