खड्यामुळे त्रास होतोय बुजवणार कोण?बीडच्या नगर रोडची दयनीय अवस्था 

खड्ड्यामुळे त्रास होतो बुजवणार कोण बीडच्या नगर रोडची दयनीय अवस्था

अँकर- बीड शहरात विकासाच्या नावाचा दिंडोरा वाजवला जात असला तरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते नगर रोड चराटा फाट्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे

व्हीओ- खड्ड्यामुळे खराब झालेल्या रस्त्याचे पूर्णपणे वाटोळे झाले आहे या रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे अनेक वाहनधारक काटे वरची कसरत करत आहेत यामुळे या खड्ड्यांचा त्रास एखाद्याच्या जीवावर बेतण्या इतका दयनीय झाला आहे तरी देखील प्रशासनाला याचे कसलेही गांभीर्य नाही अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी देखील केली मात्र याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही

व्हीओ

बीडचा नगर रोड म्हणजे संपूर्ण सरकारी कार्यालयाचे माहेरघर कोर्ट तहसील जिल्हाधिकारी कार्यालय पाटबंधारे विभाग पंचायत समिती यासह अन्य कार्यालय याच रोडवर आहेत त्यामुळे या रस्त्यावरती सातत्याने वाहतुकीची वर्दळ असते शिवाय या रोडवर अनेक गावे जोडले गेलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी असते आणि पाणी साचल्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे बरेच मोटर सायकल स्वार या खड्ड्यातून खाली पडले आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न होता उपस्थित होत आहे