करमाळा - वाट पाहीन पण एस्टीनेच जाईन म्हणणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवाहनच्या कर्मचाऱ्याचा कटू अनुभव आलाय. एका कृतघ्न वाहकाने तिकिटाचे सुट्टे पैसे नसल्याने या वृद्ध दाम्पत्याला अर्ध्या रस्त्यात सोडून आपली बस पुढं दामटलीय... त्यामुळे एसटी वाचकांच्या त्या कृतीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
गुरुवारी गणेश विसर्जनाच्या सकाळी करमाळा कर्जत गाडीमध्ये सात वाजून पंधरा मिनिटांनी एक दांपत्य करमाळा नागोबा मंदीरापासुन बसले.दादा धनवे व छबुताई धनवे असे या दांपत्याचे नाव आहे. त्यांना आठ ते दहा किमी लांब असलेल्या भोसे येथे जायचे होते. पण त्यांच्याकडे शंभर रुपयांची नोट असल्याने सुट्टे पैसे देऊ शकले नाहीत.त्यामुळे संतप्त वाहकाने त्या दांपत्याला गाडीतून मध्येच उतरविण्यात आले. त्यामुळं वयोवृद्ध दाम्पत्याला नाहक त्रास सहन करावा लागलाय.
त्यामुळे अशा पद्धतीने या वृद्ध दाम्पत्याला गाडीतून उतरले जात असेल तर एसटीच्या या कर्मचाऱ्यांकडे थोडीशी माणुसकी शिल्लक नाही का असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.
संप काळात ज्या लोकांनी तुम्हाला अडचणीच्या काळात असल्याचे पाहून तुमच्यासाठी अनेक त्रास सहन करून सुद्धा तोंडातून ब्र शब्द काढला नाही अशा लोकांना जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर पुढील काळात लोक तुमच्यासाठी त्रास सहन करून घेण्यापेक्षा तुम्हाला तुमची योग्य दाखवा जागा दाखवल्याशिवाय नाहीत.त्यामुळे वेळीच स्वतःमध्ये सुधारणा करून घ्या अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार असाल.अशी चर्चा व्हायरल व्हिडिओ वर व्यक्त होत आहेत.