बीड प्रतिनिधी:- येथील आदर्श शिक्षण संस्थेचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात आदर्श गणेश महोत्सवाचे मोठ्या उत्साहात सल्लागार डॉ. अरुण भस्मे यांचे मार्गदर्शना खाली आयोजन करण्यात आले होते. 

गणेश महोत्सवा अंतर्गत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले,यामध्ये शिक्षक दिनी महाविद्यालय संलग्नित महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य अभियान राबवण्यात आले. सात तारखेला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले.या स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील प्रथम ते फायनल वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे निकाल घोषित करून विजेत्या विद्यार्थ्यांस बक्षीस वितरणाचा ही कार्यक्रम संपन्न झाला. 

   आदर्श गणेशोत्सव समितीच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. अनंत चतुर्थी दिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गोशाल, ऊप प्राचार्य डॉ.गणेश पांगारकर यांच्या हस्ते आरती करून श्रींच्या भव्य मिरवणुकीस डीजे च्या तालावर सुरुवात झाली.यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गणरायास मोठ्या उत्साहात निरोप दिला. यावेळी डॉ. रावसाहेब हंगे,डॉ.अनिस,वैभव शहापुरे,डॉ गणेश खेमाडे,श्री वैजनाथ शिंदे,एकनाथ टेपाळे,आकाश पाचंगे रमेश थोरात उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श गणेश महोत्सवाचे अध्यक्ष अजय गिरी उपाध्यक्ष आशुतोष जोजारे यांचे सह संजना शेवंते,शेख अयाज,शहाबाज खान,मयंक यादव,पृथ्वीराज मरकड,जयश अटकरे, ओमप्रकाश भोसले,अक्षय दळवी,प्रियंका मुंडे, आकाश टकले,विजय गोपाळघरे,गणेश कादे,प्रफुल्ल काकडे,यश देशमुख,विशाल लगड,धनंजय तागड, ऋतुजा जगदाळे,प्रियंका पांडे,गायत्री वडे,ऋषिकेश जेथलिया,सुशांत घाडगे,शितल तुपे,रोशन राठोड, दीपक पवार यांनी परिश्रम घेतले.