पैठण येथे होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी वॉटर प्रूफ मंडप सज्ज...

पैठण(विजय चिडे) पैठण शहरात कै. दिगंबर कावसानंकर मैदानावर सोमवारी (दि.12)सप्टेंबर रोजी होणाऱ्या विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे.या सभेसाठी संपूर्ण वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात येत असून आज शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे व शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख रमेश देविदास पवार यांनी पाहणी केली.

यावेळी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख रमेश पवार म्हणाले की राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पैठण येथे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभेत विविध विकास कामांसाठी कोट्यावधींची घोषणा केली जाणार आहे.

यात ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यान व पैठण शहरातील पाणीपुरवठा योजना, नाथ मंदिराच्या पाठीमागील घाटासह विविध विकास कामांची घोषणा होणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले, माजी तालुका प्रमुख आण्णाभाऊ लबडे, शहादेव लोहारे, सुधीर जाधव, नामदेव खरात, भूषण कावसांनकर, शेखर शिंदे, सोमनाथ भारतवाले, निवृत्ती मापारी, संतोष बोठे यांच्या सह कार्यकर्त्यांनी सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाची पाहणी केली.