औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील भडकली परिसरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अंशीदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढण्यात आली. २१ आगस्ट २०२२ रोजी नासिक येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेची "राज्य कार्यकारिणी सभा पार पडली होती. या सभेत राज्यातील सरकारी-निमसरकारी-शिक्षक शिक्षकेतर कर्मचान्यांना हक्काची "जुनी परिभाषित पेन्शन योजना" लागू करण्यात यावी, या मागणीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्र शासन या मागणीबाबत अत्यंत उदासिनतेने कार्यवाहीची पावले उचलताना दिसून येत आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू झालेली नाही, यावरुन नवीन पेन्शन योजना कर्मचा-यांच्या हिताची नाही हे समजते. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज औरंगाबादमध्ये कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढली. आम्हाला घरामध्ये स्थानाचे मान मिळण्यासाठी जुनी पेन्शन मिळणे ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.