पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माखणी येथील एन.एम.एम.एस. धारक विद्यार्थिनी गायत्री चांदजी आवरगंड हिचा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा पुरस्कार वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. 2022- 23 चा सत्कार करताना जिल्हा परिषद परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे, डॉ.रामेश्वर नाईक, माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे,माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी शिक्षण सभापती कांतराव झरीकर, गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसिकर इतर मान्यवरांसह मार्गदर्शक शिक्षक सुनील शेळके,केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के जिल्हा गुणवत्ता कक्षाचे कैलास सुरवसे उपस्थित होते. गायत्रीच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जोशी, पदवीधर शिक्षक राजकुमार ढगे, मार्गदर्शक शिक्षक सुनील शेळके सुरज पौळ,राम महाजन,गजानन पवार व ज्योती झटे आदींनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन केले आहे. तिच्या यशाबद्दल परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं