बीड - बीड जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टर ने रुग्णांना चक्क जनावरांची औषधे आणि इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . राजेंद्र जवंजाळ असे त्या बोगस डॉक्टर चे नाव असून त्याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे . या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे . दोन दिवसांपूर्वीच शिरूर येथील डॉ बडजाते विरुद्ध कारवाई झाली होती . जे पाथर्डी तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे एका बोगस डॉक्टरने तब्बल ४० माणसांना चक्क जनावरांचे इंजेक्शन दिल्याचे उघड झाले आहे . आपण स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत राजेंद्र जवंजाळ या व्यक्तीने जनावरांचे औषध वापरून ४० हून अधिक महिला व पुरूषांना पाठ , गुडघा व मानेला इंजेक्शन दिले . या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांनी पकडून तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ . बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले आहे . 

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |

 तिसगाव येथे या डॉक्टरांच्या बॅगेतील औषधांची खातर जमा झाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी त्याला अटक केली आहे . राजेंद्र सदाशिव जवंजळे ( रा . जिल्हा बीड ) असे पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे . करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र जवंजळे हा डॉक्टर म्हणून या गावात आलेल्या व्यक्तीने मानेचे , गुडघ्याचे पाठीचे दुखणे ज्या नागरिकांना आहे त्यांना नेमकी दुखणाऱ्या जागेवरच इंजेक्शन देऊन प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये उकळत होता . गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील नागरिकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत आहे . गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह आढळून आली . संबंधित व्यक्तीकडील औषधांचा पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर या व्यक्तीला पाथर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्या ठिकाणी या बोगस डॉक्टर या गावातील नागरिकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत आहे . गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह आढळून आली . संबंधित व्यक्तीकडील औषधांचा पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर या व्यक्तीला पाथर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्या ठिकाणी या बोगस डॉक्टरच्या विरोधात तिसगावचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या फिर्यादीवरून या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे . या बोगस डॉक्टरला तिसऱ्याच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाठवले होते आणि तो हे माणसांच्या जीवाशी खेळणारे काम करत असल्याचे आढळून आले आहे यात आणखी भयानक म्हणजे हा तिसरा व्यक्ती या बोगस डॉक्टर कडून दररोज कमिशन म्हणून एक हजार रुपये घेत होता आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे