उदगीर येथे गेल्या 56 दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड बिदर रोडवरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी राज्यपाल आयुक्त जिल्हाधिकारी बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदने देऊन वारंवार विनंती करून सुद्धा आंदोलनाच्या 56 दिवसानंतर ही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे पत्रकारांनी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून लवकरात लवकर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्यात यावे अशी मागणी या रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढावे अन्यथा मनसेच्या वतीने पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या रास्ता रोको आंदोलनात दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रशासनास दिला आहे