परिषदेचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांनी आपल्या मतदार संघात अनेक विकासाचे कामे केली असून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा कशा मिळतील यासाठी वैजनाथ ठाकूर यांचा नेहमी पाठपुरावा

असतो. धूतूमच्या नागरीकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोणातून धूतूम गावाजवळील सुरुंगपाडा गाव ते रेल्वेमार्ग गेट या रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटीकरण करण्यात आले. सदर रस्त्याचे भूमीपूजन वैजनाथ ठाकूर यांनी केले असून त्यांच्याच विशेष प्रयत्नाने हा रस्ता बनला आहे. सुरुंगपाडा गाव ते रेल्वेमार्ग गेट हा रस्ता बनल्याने ग्रामस्थांनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

यावेळी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जि.प.सदस्य वैजनाथ ठाकूर,रिक्षा युनियनचे सल्लागार विश्वास रामशेठ पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष- मच्छिंद्र ठाकूर, रमेश पाटील, दिलीप शेठ मुंबईकर, ऑलइंडियाचे मॅनेजर सदानंद ठाकूर , संजय ठाकूर ( एस.के. ), समिर ठाकूर, अरुण ठाकूर, सुरज जोमा ठाकूर , निशांत ठाकूर आणि कामगार उपस्थित होते.