डिजे बंदीच्या कारवाईने विसर्जनाला बिडकीनमध्ये सुरुवात ; बिडकीन पोलिसांची धडक कारवाई

औरंगाबाद(विजय चिडे)राज्यभरात आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे . दरम्यान यासाठी गावागावातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात . मात्र औरंगाबाद जिल्ह्यात यावेळी गणेशोत्सवात डीजे वापरण्यासाठी बंदी असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे . परंतु तरीही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी डीजे लावण्यात आल्याने पोलिसांनी कारवाई करत डीजे ताब्यात घेतले आहे . औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलिसांनी ही कारवाई केली आहे .पैठण तालुक्यातील पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील शेकटा येथे आज गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे . त्यामुळे मिरवणुकीची तयारी म्हणून वाहन क्रमांक MH - 11 - T - 6592 आयशर आणि वाहन क्रमांक MH - 39 - C - 6791 अशा दोन वाहनांमध्ये डीजे बसवून सराव सुरू होता . दरम्यान याची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी गावात जाऊन दोन्ही डीजे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावले आहेत.याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.