हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असलेल्या कापडसिंगी तांडा येथील चिमुकल्या मुलीच्या रूपान देवी आल्याचा नागरिक दावा करतायत..

यामुळे येथे हजारो लोक या मुलीला बघण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार येथे गर्दी करतायत...

पाच महिन्यापूर्वी या जन्मलेल्या चिमुकलीच्या कपाळावर मंगळवार व शुक्रवार रोजी कपाळावर लाल चट्टे उमटत असल्याचं येथील नागरिकांनी व घरचे लोक सांगतायत..

मात्र येथे आता अंधश्रद्धेचा बाजार सुरू झालाय..

तसेच या घरामध्ये आपोआप गोटे वर आल्याचा देखील येथील नागरिक सांगतायत..

मात्र हा अंधश्रद्धेचा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पसरलाय तर येथे येणाऱ्या महिलांना अंगात आल्याचा प्रकार सुरू झालाय..तर मोठ्या प्रमाणात महिला झुलताना दिसतायत हा अंधश्रद्धेचा बाजार असल्यान या मुलीची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी आता होतेय..