सेलू येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी बुधवार ७ सप्टेंबर रोजी अटक करून गुरुवार ८ सप्टेंबर रोजी परभणी विशेष जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायमूर्ती एस.पी. पिंगळे यांनी दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सेलूत पीडित मुलगी व तिचा मावसभाऊ हे ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० त्यांच्या शेतातून महालक्ष्मी सणानिमित्त हराळी गवत सेलूत घेऊन जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी पीडित मुलगी व तिच्या मावसभावास जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर बसविले. त्यानंतर आरोपींनी दोघांना बोरी परिसराकडे नेले.
त्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. दहा पथके, सीसीटीव्ही तपासणी, गोपनीय माहितीवरून पोलिसांनी बुधवारी ११ वाजता जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारात दोन जणांना पकडले. या दोन्ही आरोपींची सेलू पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांना अटक केली.