परभणी(प्रतिनिधी)
मरणोत्तर नेत्रदानाने अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणता येतो. नेत्रदान ही काळाची गरज झाली आहे. इच्छुकांनी पुढे येऊन नेत्रदान करावे असे प्रतिपादन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नेत्रतज्ज्ञ डॉ. अर्चना गोरे यांनी केले.
नेत्रदान पंधरवाड्याचा समारोप गुरुवारी (दि.8) करण्यात आला. यावेळी शासकीय नेत्र रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अर्चना गोरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. एस.आर. यादव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. गोरे म्हणाल्या की, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश होऊ शकतो. नेत्रदान ही गोपनीय प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणाला काहीही त्रास होत नाही. नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढे यावे. सूत्रसंचलन मयुर जोशी तर आभार चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी अधिपरिचारिका एम. सोनवणे, वैद्य, एम.बी.शेख आदींनी परिश्रम घेतले. नेत्रदान पंधरवाड्यात जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.