पाथरी येथील पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे तथा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पाथरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद भूषविणारे अशोकराव गिराम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष राहिलेले माजी नगरसेवक विठ्ठलराव रासवे यांनी गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

           या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार सुरेश जाधव, शिंदे गटाचे पाथरी तालुका प्रमुख गोविंदराव गायकवाड, गंगाखेडचे तालुकाध्यक्ष मुंडे यांची उपस्थिती होती.

          पाथरी तालुक्यातून या पुर्वी पंसचे माजी सदस्य गोविंदराव गायकवाड, माजी सभापती दत्तु नागमोडे यांच्यासह अन्य काहीजणांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या नंतर गुरुवारी राकाँचे पाथरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम, राकाँचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव रासवे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदेगटात प्रवेश केला. या विषयी मागिल अनेक दिवसां पासुन पाथरी शहर आणि तालुक्यात चर्चा होती. या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.

१२ सप्टेबर दिग्गजांचा प्रवेश?

          रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण येथे १२ सप्टेबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील काही मात्तब्बर नेत्यांसह तीसजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रिशीर सुत्रांकडून मिळाली आहे. यापैकी बहुतांश पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत.