सेलू येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ मानवत येथील सर्व सलून बंद ठेवून नाभिक समाजाने गुरुवार ८ सप्टेंबर रोजी निषेध नोंदविला.
नाभिक समाज महामंडळाच्यावतीने तालुका महसूल प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष विष्णू वाघमारे, हरि पारवे, चंद्रशेखर सणवे, विष्णू हरणे, मधुकर खटले, रामेश्वर राऊत, संतोष सणवे, वशिष्ठ भाले, दत्ता राऊत, भागवत राऊत, जालिंदर वाघमारे, हिरालाल राऊत, गणेश राऊत, महेश राऊत, दत्ता हरणे, उत्तम खटले, दिगंबर हरणे, बालाजी दहे, जीवन शिंदे आदी सहभागी होते.