स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून चोरीची दुचाकी जप्त केल्या आहेत . सोहन मोहन इंगळे राहणार . बोरगाव पेठ तालुका . अचलपूर जिल्हा . अमरावती असे आरोपीचे नाव आहे . आरोपी हा कमी पैशांमध्ये दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत होता . त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली . आरोपीने चोरीची दुचाकी बोरगाव पेठ येथील राहत्या घरासमोर उभी केली होती . या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली . त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमंतीची दुचाकी जप्त केली आहे . सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी चोरी , मारामारी सारखे गुन्हे दाखल आहेत . सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी मुद्देमालासह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ , अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव , पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रामेश्वर धोंडगे , पीएसआय मुलचंद भांबुरकर , एएसआय दीपक उईके , पोलिस नाईक युवराज मानमोठे , मंगेश लकडे , यांनी केली आहे .