प्रतिनिधी | बीड

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

बीड शहरातील हिरालाल चौकातील बुरूडगल्लीतील आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीने गुरूवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता सामुदायिक अथर्वशिर्षाचा कार्यक्रम पार पडला. या अथर्वशिर्षात २५१ महिला सहभागी होवुन पठण केले.

बीड शहरातील आझाद हिंद गणेश मंडळाचे यंदा ५५ वे वर्ष असुन गुरूवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता बुरूड गल्लीत खास महिलांसाठी सामुदायिक अथर्वशिर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राणा चव्हाण, नगरसेवक सम्राट चव्हाण, नगरसेवक शुभम धुत यांची प्रमुख उपस्थीती होती. या वेळी पुरोहीत घनशाम महाराज जोशी यांनी उपस्थीत महिलांकडून अथवर्षशिर्षाचा पाठ म्हणून घेतला. यावेळी अथर्वशिर्ष कार्यक्रमात सारीकाताई क्षीरसागर,राखीताई चव्हाण, सिमाताई चव्हाण यांनी सहभागी होवुन अथर्वशिर्ष पठण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील विभुते, अमोल चिपाडे, सचिन वडतीले, रवी कानडे, अमित कानडे,अभिजीत कानडे , प्रवीण वडतीले, विद्याभुषण बेदरकर, सोमानाथ कानडे ,गणेश मुळे, समर्थ पटकुटवार, रघु संगा, अमर संगा, रोहीत वडतीले, सौरभ गुंडगे, निलेश कानडे, महेश कानडे, गौरव गुंडगे, विकास नगरे, अमोल होनराव यांनी परिश्रम घेतले.

संकल्पसिध्दी गणपतीची केली आरती

दरम्यान दुपारी १२ वाजता बीड शहरातील आझाद हिंद गणेश मंडळाच्या संकल्पसिध्दी गणपतीची कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सारीकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.