जिंतूर प्रतिनीधी citiy news 24 🗞️
जिंतूर तालुक्यातील भोसी येथील सोपान रावसाहेब ठोंबरे यांच्या गावालगत असलेल्या शेतामध्ये एम एस सी बी चा ट्रांसफार्मर आहे. त्या ट्रान्सफॉर्मर चे तार एकदम लोमकळलेल्या अवस्थेत आहेत व जीर्ण झालेले आहेत तार तुटण्याच्या घटना वारंवार होत असतात परंतु एम एस सी बी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून सतत दुर्लक्ष केले जाते.
काल दिनांक 7/9/2022 च्या मध्यरात्रीपासून तार तुटलेली अवस्थेत आहेत आहेत परंतु अद्याप कुठल्याही कर्मचारी येथे येण्यास तयार नाही व फोन उचलण्यासाठी तयार नाही,
येथील शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की कधीही तार तुटला फ्युज उडाला तर आम्हाला स्वतः दुरुस्त करावा लागतो.
कदाचित अपघात झाला तर याचे जिम्मेदार कोण असणार असा प्रश्न गावातील नागरीकांना व शेतकऱ्यांना पडला आहे.