परळीत 'चला हवा येऊ द्या' ची हवा...!

भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्या विनोदांच्या मेजवणीने परळीकर मंत्रमुग्ध

महिलांची लक्षणीय उपस्थिती

वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात चला हवा येऊ द्या फेम कलाकारांनी उपस्थितांना हसवून लोटपोट केले

परळी (दि. 08) - आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानद्वारे आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध मराठी हास्य शो चला हवा येऊ द्या फेम कलाकारांनी उपस्थितांना हास्य मेजवणीने मंत्रमुग्ध केले. चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आदींनी आपल्या एकापेक्षा एक सर विनोदांमधून उपस्थितांना हसवून हसवून लोटपोट केले.

बुधवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सुंदर बैठक व्यवस्था व आयोजनाचे सर्वच कलाकारांनी देखील कौतुक केले. 

प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या मंडपासह अनेकांनी हा कार्यक्रम नाथ प्रतिष्ठानने नव्याने सुरू केलेल्या युट्युब चॅनल द्वारे देखील पाहिला. 

तत्पूर्वी श्रींची आरती व कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, सुरेश टाक यांच्यासह सपत्नीक आलेले डॉ. सतीश गुठे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. सूर्यकांत मुंडे, डॉ. राहुल देशमुख, डॉ. विजय रांदड, डॉ. अजित केंद्रे तसेच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कल्पना ताई आघाव, शहराध्यक्ष सोफियाताई नंबरदार, शिल्पाताई मुंडे, वर्षाताई दहिफळे, अर्चना ताई रोडे, पल्लवीताई भोईटे, संगीताताई मुळे, संगीताताई टाक, वैशाली ताई तिडके आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमास आलेले भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, तसेच पार्श्वगायिका व कलाकार हेमलता बाने, ऐश्वर्या बडदे आदींचे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी दीपकनाना देशमुख, भाऊसाहेब कराड, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, अय्युबभाई पठाण, प्रणव परळीकर, अनंत इंगळे, रवी मुळे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष गोविंद कराड, अमित केंद्रे यांसह आदी उपस्थित होते.