अमरावती
अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी येथे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले रुग्णालयातील कपडे धुणारे 4 कर्मचाऱ्यांना गेल्या 17 ते 18 महिन्यापासून चे पगार झाले नाहीत आहेत. त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे सोबत अनेक वेळा कागदपत्रे व्यवहार केला होता. मात्र त्यांना अद्याप पर्यंत पगार नसल्याने या कंत्राटी कामगार यांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे.या आंदोलनावर जिल्हा सामान्य रुग्णालय याच्या मार्फत आश्वासन दिले गेले आहे. की 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण पगार देण्यात येणार आहे.