परभणी(प्रतिनिधी)भारतीय बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत ‘योनेक्स सनराईज’ पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन अजिंक्यपदक स्पर्धांना बुधवारपासून (दि.7) जिल्हा क्रिडा संकुलासमोरील बॅडमिंटन हॉलमध्ये थाटात प्रारंभ झाला आहे.
जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्र मणि, जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, मयूर पारिख, भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे सहसचिव अनिल चौगुले, सह अध्यक्ष प्रदीप गंधे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुंदर शेट्टी, उपाध्यक्ष आशिष वाजपेयी आदींची उपस्थिती होती.
आयोजक तथा परभणी जिल्हा बॅटमॅन असोसिएशनचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रविंद्र देशमुख, आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतूपर्ण कुलकर्णी, मंगरीश पालेकर, पंचप्रमुख सतीश माल्ल्या, गोवा असोसिएशनचे सचिव संदीप हेगडे, अॅड. दीपक देशमुख, श्रीकांत साखरे, नागोजी चिंतलवार, योनेक्स प्रतिनिधी बालकिशन चौधरी, धनंजय देशमुख व पाटील हे यावेळी व्यासपीठावर विराजमान होते. यावेळी आमदार वरपुडकर व आमदार पाटील यांनी आठ कोर्टचे बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देवू, अशी घोषणा केली. परभणी जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनचे सचिव रविंद्र देशमुख यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील मोडक यांनी केले. सचिन अंबिलवादे यांनी आभार मानले.