पालम आज दिनांक रोजी शिवनेरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन‌ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर सी घोगरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर बी भस्के सर , प्रा.आर गायकवाड सर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वांचे स्वागत स्वागत गीताने केले व सर्व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी अनमोल व सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.