भारतीय बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत ‘योनेक्स सनराईज’ पश्‍चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन अजिंक्यपदक स्पर्धांना बुधवारपासून (दि.07 सप्टेंबर) जिल्हा क्रिडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात प्रारंभ झाला. जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धांचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते झाले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु इंद्र मणि, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, मयूर पारिख, भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे सहसचिव अनिल चौगुले, सह अध्यक्ष प्रदीपजी गंधे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुंदर शेट्टी, उपाध्यक्ष आशिष वाजपेयी आदींची उपस्थिती होती. आयोजक तथा परभणी जिल्हा बॅटमॅन असोसिएशनचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रविंद्र देशमुख, आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतूपर्ण कुलकर्णी, मंगरीश पालेकर, पंचप्रमुख सतीश माल्ल्या, गोवा असोसिएशनचे सचिव संदीप हेगडे, अ‍ॅड. दीपक देशमुख, श्रीकांत साखरे, नागोजी चिंतलवार, योनेक्स प्रतिनिधी बालकिशन चौधरी, धनंजय देशमुख व पाटील हे यावेळी व्यासपीठावर विराजमान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील मोडक तर प्रास्ताविक रविंद्र देशमुख यांनी केले. देशमुख यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका विशद केली. यावेळी आमदार वरपुडकर व आमदार पाटील यांनी आठ कोर्टचे बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देवू, अशी घोषणा केली. यावेळी सचिन अंबिलवादे यांनी आभार मानले. दरम्यान, सचिन आंबिलवादे, डॉ. श्याम जेथलिया, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष सुधीर मंगरूळकर, आशिष शहा, विजय मुंदडा, विनोद जेठवणी, नरेंद्र झांजरी, पांडुरंग कोकड, भगवान खैराजांनी, उन्मेश गाडेकर, सुनील देशमुख, इंद्रजित वरपूडकर, प्रा. डॉ. सुनील मोडक, रवि लड्डा, डॉ. श्रीकांत मणियार, डॉ. चेतन मोकाशे, रुपेश सोनी, सुनील कालानी, जे.डी. सोमानी, प्रदीप काबरा, पवन सारडा, अमोल ओझमवार, सागर पातूरकर, विकास जोशी, संकेत सोमवंशी, प्रवीण देशपांडे, शिवाजी वाघमारे, प्रवीण चौधरी, सचिन वट्टमवार, महेश कांकरीया, प्रा. संतोष कोकीळ, डॉ. प्रसाद मगर, सुनील कदम, प्रा. शाहू चव्हाण, ऋषभ फुरसुले, योगेश अदमे, योगेश बरदाळे, सय्यद गफार, शंकर शहाणे, गिरीश पामे, भारत भानुशाली, गणेश लिंगमपल्ली, यश दांडेकर, कपील मेहता आदी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशिल आहेत.