जिंतूर(प्रतिनिधी)सेलू येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपी पसार झाले होते. परभणी पोलीस दलाच्या वतीने मागील 36 तासापासून शोधमोहीम सुरू होती.
शेवटी आज बुधवारी जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारात ग्रामस्थांच्या मदतीने त्या आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनास यश आले. पसार झालेल्या व परभणी पोलीस दलाला आव्हान दिलेल्या गुन्ह्यातील नराधम आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या तसेच जनतेला आपण एक जबाबदार नागरिक असल्याचे दाखवून सर्वांसाठी एक आदर्श घालून दिलेल्या जिंतूर तालुक्यातील पांढरगळा येथील नागरिकांचा जिंतूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच पांढरगळा व राजेगाव येथील नागरिक उपस्थित होते.