पाथरी (वार्ताहर)परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून जबरदस्तीने पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेतील दोन आरोपीचे प्रकरण जलदगती न्यायायलयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते यांचेसह महिला पदाधिकारी यांना बुधवारी पाथरी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सादर केले आहे. सेलू शहरात खाणीचा मारोती परीसरातील रस्त्यावरून अल्पवयीन मुलगी व पिडीत मुलीचा मावसभाऊ मुलगा यास जबरदस्तीने पळवून नेले. कोक शिवारात या नराधमांनी या मुलीवर अत्याचार केला.हि घटना मानवजातीला काळीमा फासणारी आहे.या घटनेती ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर करू नये.याशिवाय न्यायायल कोठडीत ठेऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते,रेखा मनेरे, मालनताई घाटूळ, नंदाताई वाळके, अनिताताई दूधमोगरे, संगीता हरकळ, आयोध्या मोगल, राधा जाधव, मंगलताई सुरवसे, मीरा वानखेडे या महिला पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sukhdev Singh Gogamedi कांड के बाद Jaipur पहुंचा Lallantop, भीड़ में अचानक आई पत्नी ने क्या कहा?
Sukhdev Singh Gogamedi कांड के बाद Jaipur पहुंचा Lallantop, भीड़ में अचानक आई पत्नी ने क्या कहा?
सर्व ब्राह्मण महासभा समिति का प्रतिनिधित्व मंडल जिला कलेक्टर से मिला
बूंदी । सोमवार को सर्व ब्राह्मण महासभा समिति जिला बूंदी के तत्वाधान में एक प्रतिनिधिमंडल जिलाधीश...
Contractual Teachers holds indefinite strike in front of Secretariat
MLA and leader, George Lyngdoh has said that the terminating contractual teachers...