सेलु यथिल दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करुन पसार झालेल्या त्या दोन नराधमांना पकडण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे.

      आज बुधवारी (दी.7)सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजेगाव शिवारातुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.दी 5 सप्टेंबर रोजी सेलु येथिल 10 वर्षिय चिमुकली आणी तिच्या भावास दोन नराधमांनी फुस लावुन आपल्या दुचाकीवर बसवुन वालुर मार्गे कौसडी येथे आल्यानंतर त्यांनी चिमुकलीच्या भावास फाट्यावर सोडुन दीले.त्यानंतर दोन्ही नराधमांनी पीडीत चिमुकलीवर कोक परीसरात नेवुन जबरदस्ती ने अत्याचार करुन माणुसकीला काळीमा फासनारी घटना केली.दरम्यान सदर प्रकरणी सेलु पोलीसात गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन परभणीचे पोलीस अधिक्षक जयंत मीना,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने,स्थागुशा पोलीस निरीक्षक चव्हान,पोलीस निरिक्षक दंतुलवार,सपोनी मुळे चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड आदींनी आरोपींचा शोध घेण्यासाठी बोरी आणी जिंतुरच्या परीसरात अख्या पोलीस प्रशासनाला कर्तव्यावर लावले होते. जिंतूर आणि बोरी येथे तर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने छावणीचे स्वरूप आले होते. घटनेनंतर पसार झालेले आरोपी जिंतूर आणि बोरी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची करून चक्रे अधिक गतिमान केली. गुपित जिंतूर जिंतूर : दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना जिंतूर पोलिसांनी राजेगाव शिवारातून ताब्यात घेतले. 

माहितीच्या साहाय्याने पो. पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत यांनी मोठ्या शिताफीने तालुक्यातील राजेगाव शिवारातून दोन्ही नराधमांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. सदरील आरोपी तालुक्यातील मानमोडी येथील रहिवाशी असून अंगद घुले आणि तुकाराम धुले अशी आरोपींची नावे असल्याचे समजते. दोन्ही आरोपीतांना सेलू पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दोन दिवसांपासून जीवाचे रान करणाऱ्या परभणी पोलिसांच्या अद्वितीय कामगिरीला अखेर यशाचे तोरण लागले आहे. इंन्सेटमध्ये दोन्ही आरोपी ची महिती मिळताच अटक करण्यात आले.

     सदरील आरोपी तालुक्यातील मानमोडी येथील आरोपीतांना सेलू पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दोन दिवसांपासून जीवाचे रान करणाऱ्या परभणी पोलिसांच्या अद्वितीय कामगिरीला अखेर यशाचे तोरण लागले आहे. पुठील तपास करीत आहे.